सिनेक्रॉन कंपनीकडून जिल्हा परिषद शाळा थेऊरला संगणक संच भेट
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने सिनेक्रॉन कंपनीने आपल्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा, थेऊर येथे संगणक संच भेट देऊन एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणार असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची…