तुटलेल्या विजेच्या तारेमुळे शेळीचा मृत्यू; १६ वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला, महावितरणच्या हलगर्जीपणाचा आरोप:
पंचायत समिती सदस्य कुशल सातव यांची घटनास्थळी धाव. राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा वाडेगाव येथील इंगळे मळा परिसरात शेतजमिनीवरून गेलेल्या तुटलेल्या व खाली लोंबकळत असलेल्या विजेच्या तारेमुळे रविवारी सकाळी गंभीर अपघात घडला. या घटनेत शेतकरी जालिंदर निवृत्ती इंगळे यांची एक शेळी विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडली, तर शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या १६ वर्षीय मुलाला देखील विजेचा धक्का…