उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत सायकल पेट्रोलिंगचा शुभारंभ.

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
उरुळी कांचन :
उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत सायकल पेट्रोलिंग उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून (CSR) पोलीस स्टेशनला एकूण ०५ सायकली प्रदान करण्यात आल्या आहेत.
आज रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, सो. दौंड विभाग, दौंड यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
उपक्रमामागील उद्देश :
१) हद्दीत गस्त वाढवून गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे व गुन्हे प्रतिबंध घडवून आणणे.
२) पोलिस कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला चालना देऊन त्यांचे आरोग्य उत्तम राखणे.
या उपक्रमामुळे –
पोलीस-जनता संपर्क अधिक मजबूत होणार,
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ होणार,
तसेच पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये फिटनेस संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे.
सदरचा उपक्रम मा. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला आहे.
— उरुळी कांचन पोलीस स्टेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags