
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर
यंदाच्या बैलपोळा उत्सवा व यशवंत कृषी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान तर्फे “माझा बैल, माझी शान” ही विशेष फोटो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
बैलाला नटवून, सजवून आणि पारंपरिक वेशभूषेत आपला फोटो पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शेतकऱ्यांचा अभिमान असलेल्या बळीराजाचा गौरव करण्यासाठी ही स्पर्धा अनोख्या पद्धतीने राबवली जात आहे.
फोटो पाठवण्याची अंतिम तारीख २ ऑक्टोबर २०२५ असून सहभागी आपले फोटो व्हॉट्सअॅप क्रमांक 9130299292 वर पाठवू शकता.
स्पर्धेचे नियम :
फोटोमध्ये स्पर्धकाचा स्वतःचा फोटो व बैल असणे आवश्यक.
पारंपरिक वेशभूषेला प्राधान्य दिले जाईल.
स्पर्धेत सहभागी झालेल्यांचे फोटो यशवंत कृषी महोत्सव सोशल मीडिया पेजवर प्रसिद्ध केले जातील.
सर्वाधिक लाईक व शेअर मिळालेल्या फोटोला जादा गुण दिले जातात.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार,
“पायामध्ये अंगार आणि नजरेत तलवारीची धार घेऊन महाराष्ट्राची शान व शेतकऱ्यांची जान असणाऱ्या बळीराजाचा हा सन्मान करण्यासाठी ही स्पर्धा आहे. शेतकऱ्यांच्या या परंपरेला आधुनिक स्पर्धेचा साज चढवून अभिमान व्यक्त करणे हे उद्दिष्ट आहे.”
अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 9850001755 / 9130299292
निमंत्रक :
पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे
प्रदेश सरचिटणीस – राष्ट्रवादी काँग्रे
स पार्टी
मुंबई महापौर केसरी










