अक्षय मारुती तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

लोणी काळभोर : प्रतिनिधी

अक्षय मारुती तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सनी शेठ काळभोर (उपसभापती पंचायत समिती) व घनश्याम बाप्पू हाके (संस्थापक मावळा ग्रुप) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नागेश काळभोर (सदस्य, लोणी काळभोर), श्री. राजेंद्र आबा काळभोर (माजी उपसरपंच, लोणी काळभोर), श्री. गुलाब भाऊ केसकर (उद्योजक), श्री. रमेश भोसले (सामाजिक कार्यकर्ते), श्री. श्रेयश भैया काळभोर (जय भवानी ग्रुप), कु. शंतनू धुमाळ (संस्थापक रौद्रशंभू प्रतिष्ठान), श्री. निखिल काळभोर (उद्योजक), श्री. शंकर धायगुडे (उद्योजक), श्री. संपत कोळपे (उद्योजक), श्री. लाला कोकरे (उद्योजक), श्री. दिपक बंडगर (उद्योजक) तसेच रौद्रशंभू प्रतिष्ठान व शंभूराजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत

मतदान कार्ड दुरुस्ती, पी.व्हि.सी. कार्ड दुरुस्ती

ई-श्रम कार्ड तयार करणे

आरोग्य तपासणी शिबिर

रक्तदान शिबिर अशा सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.

📌 या शिबिरात ४५ लोकांनी रक्तदान केले. तसेच जेष्ठ नागरिक व माता वाघिणींनी योजनांचा लाभ घेतला.

👉 सामाजिक बांधिलकी जपत अक्षय मारुती तांबे यांनी आपला वाढदिवस समाजोपयोगी कार्य करून साजरा केला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags