खडकी गावात वेश्याव्यवसायावर धडक कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp

 

प्रभाकर अण्णा शेट्टीसह दहा महिला पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

दौंड तालुका │ दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत रावणगाव पोलीस चौकीच्या हद्दीतील खडकी गावात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा भंडाफोड झाला आहे. प्रसार माध्यमांवर स्टिंग ऑपरेशन व बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलिसांचे पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी तातडीने संपूर्ण माहिती गोळा करून शहानिशा केली. त्यानंतर विशेष पथक तयार करून थेट धडक कारवाईचे आदेश दिले.

विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांवर संशय असल्याने या कारवाईबाबत त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिक पोलिसांना वगळून थेट पुण्यातून आलेल्या विशेष पथकाने ही कारवाई केली आणि परिसरात मोठी खळबळ उडाली.

दरम्यान, दौंड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भूमिका संशयास्पद असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी माहिती मिळाल्यानंतरच कारवाई केल्याचा दावा केला होता. याच कारणामुळे पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी थेट विशेष पथक पाठवून कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

या धडक मोहिमेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या दहा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर मुख्य सूत्रधार व मास्टरमाईंड प्रभाकर अण्णा शेट्टी यालाही बेड्या ठोकण्यात आल्या.

या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. तथापि, स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या प्रकरणाची पुढील चौकशी होण्याची शक्यता आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags