पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये FDA ची मोठी कारवाई; ₹१.१८ कोटींचा अन्नसाठा जप्त, सहा जणांना अटक

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये FDA ची मोठी कारवाई; ₹१.१८ कोटींचा अन्नसाठा जप्त, सहा जणांना अटक
Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या विविध कारवायांमध्ये तब्बल ₹१ कोटी १८ लाख ४३ हजार रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणांत चार गुन्हे दाखल करण्यात आले असून सहा जणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी विविध ठिकाणी तपासणी आणि छापेमारी करत संशयास्पद अन्नपदार्थांचा साठा ताब्यात घेतला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत अन्नपदार्थांची मागणी वाढत असल्याने अन्नपदार्थांची गुणवत्ता, साठवणूक आणि विक्री यावर प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
₹१.१८ कोटींचा साठा जप्त झाल्याने पुणे-पिंपरी चिंचवड परिसरातील अन्न विक्रेते आणि व्यावसायिकांमध्ये या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags