महाविद्यालयीन युवकांची ऊर्जा राष्ट्रउभारणीसाठी महत्त्वाची – सरपंच सुनिताई चौधरी
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा सोरतापवाडी (दि. …) महाविद्यालयीन जीवन हा भविष्यातील देशउभारणीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून युवकांमधील ऊर्जेचा सकारात्मक वापर झाल्यास राष्ट्राच्या समग्र विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन सोरतापवाडीच्या सरपंच मा. सुनिताई चौधरी यांनी केले. त्या समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे…